सोशल मीडियाचे जग आश्चर्यकारक घटना वा दुर्घटनांच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. दररोज असे व्हिडीओ समोर येतात की, जे पाहून आपल्याला धक्का बसतो. डोळ्यांवर विश्वास बसत नाही की, असे काही दिसेल. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका गर्लफ्रेंडचा असल्याचे दिसत आहे; जी तिच्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत आहे. मात्र, या संवादादरम्यान महिला रेल्वे रुळांवर पोहोचली आणि अचानक मालगाडीही त्याच वेळी वेगाने आली. फ्रेममध्ये जे काही दिसले, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. रेल्वेचा हा मनावर दडपण आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेक लोक हेच बोलत आहेत की, देव तारी त्याला कोण मारी!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म दिसत आहे, जिथे प्रवासी ट्रेन येण्याची वाट पाहत उभे आहेत. पण, त्याचदरम्यान एक नजर एका मुलीवर पडते आणि तिच्या हावभाव व हालचालींवरून ती प्रियकराशी फोनवर बोलत असल्याचे लक्षात येते. आपल्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारण्यात ती इतकी मग्न झालेली असते की, तिला आजूबाजूचे कसलेही भान राहत नाही. यापुढे आपण पाहणार आहोत की, ती तरुणी संवादात इतकी मग्न झालीय की, ती खाली उतरून ट्रॅकवरच पोहोचली. त्यानंतर काही क्षणांत एक मालगाडी समोरून भरधाव आली; परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे ती तरुणी सुरक्षित राहिली. कारण- तिने गाडी येत असल्याचे लक्षात आल्या क्षणी तीक्ष्ण बुद्धीचा वापर केला आणि ती सरळ रुळांमध्ये पडून राहिली. मग मालगाडी तिच्यावरून पुढे निघून गेली. पण, त्यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसेल, ते दृश्य तुमचा गोंधळ उडवून देईल.

(हे ही वाचा : Video: धावत्या ट्रेनमध्ये जोडप्यांसह तरुणाचा तुफान राडा पाहून नेटकरी म्हणाले, “रेल्वेतील सीटची समस्या ही…” )

शेवटी आपण पाहणार आहोत की, मृत्यूतून सुटलेली प्रेयसी उठून पुन्हा तिच्या प्रियकरासोबत बोलू लागली. या व्हिडीओमध्ये मुलगी रुळांवर बसून आरामात फोनवर बोलत आहे. परंतु, फोनवर बोलत असलेल्या या मुलीवरून गाडी गेल्यानंतरही तिला काहीच दुखापत होत नाही. त्यात विशेष म्हणजे ट्रेन तिच्यावरून जात असताना फोन तिच्या कानालाच लागलेला असतो आणि ट्रेन गेल्यावरही ती फोनवर तशीच बोलत राहते. हे सर्व दृश्य पाहून आता नेटकरी फार भडकले आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

फ्रेममधला हा सीन सर्वांत जास्त पाहण्यासारखा आहे. गर्लफ्रेंडच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट्स करीत आहेत. हे माहीत आहे का की, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर meemlogy नावाच्या हॅण्डलसह शेअर केला गेला आहे; ज्याने आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स गोळा केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl talking on the phone on railway track and then watch what happened video goes viral pdb