मराठी भाषा गौरव दिन २०२४ : आज २७ फेब्रुवारीला राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. तर या दिवसाला आणखीन खास करण्यासाठी अनेक कौतुकास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. तर मुंबई पोलिसांनीसुद्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. पण, मराठी भाषा महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये अधिक प्रमाणात बोलली जाते. त्यामुळे मराठी भाषा दिन हा मराठी बोलल्या जाणाऱ्या लोकांसाठी अगदीच अभिमानाचा दिवस आहे. आज मुंबई पोलिसांनीसुद्धा मराठी शब्दप्रयोगांचा उपयोग करून दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक पाहता, एक खास पोस्ट शेअर केली आहे. एकदा पाहाच ही पोस्ट.

हेही वाचा…‘मराठी वाजलेच पाहिजे’ या थीमवर पबमध्ये मराठी गाणी वाजवणारा कृणाल घोरपडे कोण? राज ठाकरेंनीही केलं कौतुक

पोस्ट नक्की बघा…

मुंबई पोलिसांनी चार फोटो शेअर केले आहेत. त्यात पहिल्या फोटोत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना ‘पूर्णविराम’ लावू. दुसऱ्या फोटोत अनोळखी लिंकवर क्लिक करताना ‘स्वल्पविराम’ घेऊ, विचार करू. तिसऱ्या फोटोत समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य ‘शब्दप्रयोग’ दाखवू, असे सांगत तुमची सुरक्षा हे आमचे प्राथमिक ‘कर्म’ आहे, असा मजकूर लिहिलेल्या पोस्ट शेअर करीत नागरिकांच्या संरक्षणाचे उदाहरण देत मराठीतील अलंकारांचा उपयोग केला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट मुंबई पोलीस यांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. “शब्द, जाती, प्रयोग, संधी, विभक्ती, वचन, काळ, समास, विरामचिन्हे अशा विविध अलंकारांचा शृंगार करून नटलेली भाषा माझी मराठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. मराठी भाषेचे महत्त्व आणि नागरिकांप्रति त्यांचे कर्तव्य सांगणारी ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police wishes on marathi bhasha gaurav diwas in different style use exemplifying the protection of citizens asp