Viral Photo : कोणतेही शिक्षण घेताना अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास केला नाही तर आपण परीक्षेत पास होऊ शकत नाही त्यामुळे लहानपणापासून आपले आईवडील आपल्याला अभ्यास करण्यास सांगतात आणि पुढे आयुष्यात आपल्याला स्वत:अभ्यास करावा लागतो. काही लोकांना अभ्यास करायची इच्छा असते पण अभ्यास नेमका कसा करावा, जास्तीत जास्त अभ्यास किती करावा, हे कळत नाही. पण टेन्शन घेऊ नका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला दिसेल की तिने चक्क १० तास अभ्यास करता येईल असे वेळापत्रक तयार केले आहेत. या वेळापत्रकाचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

१० तास अभ्यास करता येईल असे वेळापत्रक

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक वेळापत्रक दिसेल.या वेळापत्रकामध्ये सुरूवातीला मोठ्या अक्षरांमध्ये १० तासांच्या अभ्यासाचे वेळापत्रक असे लिहिले आहे.त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजून १० मिनिटांपर्यंत अभ्यास आणि इतर कामे कसे करता येईल याविषयी सविस्तर सांगतिले आहे.

हेही वाचा : VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका

वेळापत्रकात सांगितल्याप्रमाणे

  • ७.०० – सकाळी उठा.
  • ७.०० -८.०० – सकाळची कामे करा आणि नाश्ता करा.
  • ८.०० -१०.०० – अभ्यास करा. (१)
  • १०.०० – ११.०० – अंघोळ करा/जेवण करा
  • ११.०० -१.०० – अभ्यास करा (२)
  • १.००-३.०० – दुपारचे जेवण/थोडा आराम करा
  • ३.०० -५.०० – अभ्यास करा(३)
  • ५.००-७.०० – तुमच्या आवडीच्या गोष्टी करा/स्वत:ला वेळ द्या
  • ७.०० ते ९.०० – अभ्यास करा (४)
  • ९.०० -१०.०० – जेवण करा/कुटुंबाबरोबर वेळ घालवा.
  • १०.०० -१२.०० – अभ्यास करा (५)
  • १२.१० – झोपा
  • टिप्स
  • अभ्यास करताना २५ मिनिटे अभ्यास करा आणि १५ मिनिटे ब्रेक घ्या
  • पोमोडोरो टेक्निकचा वापर करा.
  • मोबाईल बाजूला ठेवा किंवा शांत ठेवा.
  • स्वत:ला बक्षिसे द्या

पाहा फोटो

my_upsc_journal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून सध्या या फोटोची सगळीकडे चर्चा आहे. या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई शाळेतल्या मुलांसाठी सुद्धा वेळापत्रक बनवून द्या.
तर एका युजरने लिहिलेय, “उत्तम वेळापत्रक ताई” एका युजरने विचारलेय, “पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय?” त्यावर वेळापत्रक शेअर करणाऱ्या मुलीने प्रतिक्रिया देत लिहिलेय, “पोमोडोरो टेक्निक म्हणजे २५ मिनिटे अभ्यास करा आणि पाच मिनिटे ब्रेक घ्या.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc student shared a timetable of 10 hours study in a day see photo goes viral ndj