Viral Video: मागील काही दिवसात सोशल मीडियावर मुलींच्या भांडणाचे व्हिडीओ वारंवार व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणी या मॉडर्न आणि उच्चशिक्षित दिसत आहेत पण तरीही अंगाईड कुत्र्या मांजरासारखी भांडणे करताना या तरुणींनी आजूबाजूला कोण आहे याचेही भान नाहीच असेच दिसून येतेय. यावेळेसही अशाच दोन तरुणी लढताना दिसत आहेत मात्र कारण जरा गंभीर आणि लक्ष देण्यासारखं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भररस्त्यात तरुणींमध्ये जुंपली रंगली आहे नेमकं असं काय झालं होतं हे आपण पाहुयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, दोन तरुणी या अगोदरच भांडणाचा एक राउंड संपवून बसल्या आहेत. आणि आता फेरीची भांडणे सुरु होणार इतक्यात कोणीतरी शूटिंग सुरु केलेले दिसतेय. एक तरुणी दुसरीवर स्वतःचे नग्न फोटो एका पुरुषाला पाठवल्याचा आरोप करत आहे. यामध्ये तरुणी मास्क घालून भांडत आहेत. पहिल्या तरुणीचा आरोप ऐकून दुसरी मुलगी तिला पुरावे मागते पण यावर माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा करून ती फोटो लीक करण्याबाबत स्पष्टीकरण मागत पुन्हा दुसरीला मारहाण करू लागते.

न्यूड फोटोवरून मुलींची मारामारी

Video: कुत्रा नाही डॉन म्हणा! एवढ्याशा कुत्र्याने थेट वाघाचा कान चावला, सिंहाने मध्यस्थी करताच…

दोन्ही मुली एकमेकींना अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ करतात त्यामुळे घटनास्थळी उभी असणारी इतर मंडळीही शरमून जातात पण विशेष म्हणजे त्यांच्या भांडणात कोणीही हस्तक्षेप करायला जात नाही. शेवटी दोघीही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगतात आणि व्हिडीओ बंद होतो. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न केला आहे. अशा प्रकारे रस्त्यात हाणामारीपर्यंत गोष्टी जातात कशा असे म्हणत काहींनी पोलिसांच्या दक्षतेवरही प्रश्न उभे केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video two girls fighting on road after one leaks nude photo on social media svs