Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणा गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी भन्नाट जुगाड दाखवताना दिसतो. अनेक जण त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करतात. तुम्ही अनेकदा रस्त्यावर सुविचार लिहिलेली पाटी हातात घेऊन उभे असलेल्या तरुणांचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. त्या पाटीवर उद्योगपती रतन टाटा यांचा फोटो लावलेला आहे आणि अतिशय सुंदर असा सुविचार लिहिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तरुणाने या पाटीवर नेमके काय लिहिले आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो हातात पाटी घेऊन भर रस्त्यावर उभा आहे. येणारे जाणारे पाटीवरील सुविचार वाचताना दिसत आहे. त्या तरुणाने पाटीवर लिहिलेय, “श्रीमंताच्या यादीत आपलं नाव आलं नाही तरी चालेल पण, माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकायलाच हवं..! बरोबर ना?” या पोस्टरवर उजव्या बाजुला रतन टाटाचा फोटो लावला आहे. अनेक जण या पोस्टरचे फोटो काढताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
posterboymonti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “RIP रतन टाटा सर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “समस्त भारत देश तुमचे उपकार विसरणार नाही सर..” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम बरोबर भाऊ आपल्यातला देव माणूस आज गेलाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली” आणखी एका युजरने लिहिलेय, “हेच कमावले या देव माणसाने” अनेक युजर्सनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहली आहे.
रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.