पतीपासून वेगळं राहत असताना पत्नीने मंगळसूत्र न घालणे म्हणजे क्रुरता आहे, असं निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांनी घटस्पोटासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी विभक्त होताना पत्नीने मंगळसूत्र काढून ठेवले होते, असे मान्य केले. यावरूनच न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत घटस्पोट मंजूर केला.

”विभक्त होताना मंगळसूत्र काढून ठेवले होते, हे पत्नीने मान्य केले आहे. कोणतीही हिंदू विवाहित स्त्री तिच्या पतीच्या हयातीत मंगळसूत्र काढत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र ही एक पवित्र वस्तू आहे. ते विवाहाचे प्रतिक आहे. त्यामुळे पत्नीने मंगळसूत्र न घालणे, ही क्रूरता आहे. अशा प्रकाराने पुरुषांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात”, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा – मध्यरात्री झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीवर जोरदार टीका; म्हणाले “बगलेमध्ये धरुन मुंडी दाबत…”

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Removal of mangalsutra by wife is cruelty said madras highcourt spb