सन्मान करता येत नाही तर अपमान तरी करू नका. तो अधिकार नाही. पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा आणि भाजपचा अपमान आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही, अशा अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर तोफ डागली.
‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वडिलांचा अपमानास्पद उल्लेख करण्यात आला असून तो आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या दारापर्यंत जाण्यासाठी आम्ही लाचार नाही. शिवसेनेने यापूर्वी पंतप्रधानांवर टीका केलेली असताना शिवसेनेच्या नेत्यांना समज दिली होती. मात्र, सामनामधून वारंवार होत असलेल्या टीकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांंमध्ये असंतोष आहे. पंतप्रधानांवर होत असलेली टीका यानंतर खपवून घेतली जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाजपने कधीही टीका केलेली नाही. आजही ते आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. आमची लढाई शिवसेनेशी नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont tolerate blame game on pm modi nitin gadkari