महावितरणच्या महाराष्ट्रातील पायाभूत आराखडा, भारनियमनाचे नियमन, माहिती तंत्रज्ञान आदी कामांची इतर राज्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून आता कर्नाटकमधील ‘बेसकॉम’ ही कंपनीही महावितरणच्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी येणार आहे.
महावितरणमध्ये पायाभूत आराखडय़ात उपकेंद्रे, रोहित्रे, वाहिन्या यांची मोठय़ा प्रमाणात उभारणी करण्यात आली. पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रमातही मोठय़ा प्रमाणात काम झाले. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन नवीन वीज जोडण्या, देयक अदायगी, संगणकीकृत देयके, रेडिओ फ्रिक्वेन्सी, इन्फ्रा रेड मीटर्स, फोटो मीटरवाचन, औद्योगिक ग्राहकांचे स्वयंचलित मीटरवाचन, ईआरपी आदी अनेक कामे केली जातात. कर्नाटकमध्ये यापैकी जास्तीत जास्त योजना कशा राबवता येतील, यादृष्टीने कर्नाटकमधील बेंगळुरू इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड बेसकॉम ही कंपनी महावितरणचा अभ्यास करणार आहे. त्याचे पथक यासाठी महाराष्ट्रात येईल, अशी विनंती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार पांडे यांनी ऊर्जा खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून केली आहे.
महावितरणने पुनर्रचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांतर्गत चांगले काम केले असून राजस्थान, त्रिपुरा या राज्यांनी या कामांचा अभ्यास करावा, असे केंद्रीय विद्युत खात्याचे सचिव बी. एन. शर्मा यांनी या राज्यातील वीज कंपन्यांना कळविले होते. महाराष्ट्रातील भारनियमन मॉडेलचा अभ्यास तामिळनाडू, बिहारसह अनेक राज्ये करीत आहेत. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान कामाची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात येत असून त्याच्या अभ्यासासाठी इतर राज्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात येत आहेत, अशी माहिती महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2014 रोजी प्रकाशित
आता ‘बेसकॉम’कडूनही महावितरणचा अभ्यास
महावितरणच्या महाराष्ट्रातील पायाभूत आराखडा, भारनियमनाचे नियमन, माहिती तंत्रज्ञान आदी कामांची इतर राज्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून आता कर्नाटकमधील ‘बेसकॉम’ ही कंपनीही महावितरणच्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-04-2014 at 09:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basecom study project