हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने त्यांच्या ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मवर हीरो एक्स प्लस ४ २०० वाल्वच्या (Hero XPulse 200 4 Valve) दुसऱ्या बॅचसाठी बुकिंग सुरू केल्याची घोषणा केली आहे. नवीन हीरो एक्स प्लस ४ २०० वाल्वची पहिली बॅच पूर्णपणे विकल्यानंतर कंपनीने दुसऱ्या बॅचसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हीरो एक्स प्लस ४ २०० वाल्वची किंमत जानेवारी २०२२ पासून वाढल्यानंतर आता १,30,१५० (एक्स-शोरूम) वर गेली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बाईक ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मद्वारे बुक केली जाऊ शकते. ग्राहक १०,००० रुपयांची टोकन रक्कम भरून ही बाईक बुक करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुकिंगच्या घोषणेवर भाष्य करताना, हीरो मोटोकॉर्पचे विक्री आणि आफ्टरसेल्सचे हेड नवीन चौहान म्हणाले की, “हीरो एक्स प्लस २०० नेहमीच एक अतुलनीय अनुभव देण्यासाठी ओळखली जाते, ज्याला तंत्रज्ञान, आधुनिक डिझाइन आणि वेगळे आकर्षण आहे. आमच्या ग्राहकांकडून हीरो एक्स प्लस ४ २०० वाल्वला मिळालेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आणि व्यापक स्वीकृती पाहून आम्ही खूप उत्साहित आहोत. तात्काळ विकली जाणारी पहिली बॅच प्रीमियम-एंड मोटरसायकलच्या मागणीत वाढीसह हिरो ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास दर्शवते. दुसऱ्या बॅचचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यामुळे, आम्ही हीरो एक्स प्लस ४ २०० वाल्वची देशात सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्याची अपेक्षा करतो.”

(हे ही वाचा: Toyota Hilux चे भारतात झाले अनावरण; या लाइफस्टाइल पिकअप ट्रकचे भारतात बुकिंग सुरू!)

(फोटो: Financial Express)

(हे ही वाचा: ‘या’ कारला एकाच दिवशी मिळाले ७७३८ बुकिंग; भारतात होतेय प्रचंड मागणी)

काय आहेत स्पेसीकेशन?

एक्स प्लस २०० बाईक तिच्या अष्टपैलुत्व, हलके वजन आणि ऑफ-रोड क्षमतेमुळे एक लोकप्रिय बाइक बनली आहे. यामध्ये १९९.६ cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे आता ८५०० rpm वर 18.8 bhp आणि चार वाल्व हेडच्या मदतीने ६५०० rpm वर १७.३५ Nm पीक टॉर्क बनवते. त्या तुलनेत, बाईकचे दोन-व्हॉल्व्ह एकसारखे इंजिन १७.८ Bhp आणि १६.४५ Nm पीक टॉर्क बनवते. नवीन तंत्रज्ञानामुळे पॉवरमध्ये ६ टक्के आणि टॉर्कमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. ही बाईक तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे – ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्लू आणि रेड. स्विचगियरमध्ये इंटिग्रेटेड स्टार्टर आणि इंजिन कट-ऑफ स्विचेस देखील जोडले गेले आहेत. उर्वरित फीचर्समध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, ब्लूटूथ-चालित इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सिंगल-चॅनेल एबीएस यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Booking begins for the second batch of hero xpulse 200 4 valve adventure bikes ttg
First published on: 21-01-2022 at 15:54 IST