पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. कमला हॅरिस यांच्यासोबतची बैठक ही मोदींच्या द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी करोना महामारीच्या कालावधीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा केली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. या बैठकीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. मात्र याच फोटोंवर भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मोदींना एक खोचक प्रश्न विचारलाय.

नक्की वाचा >> मोदींच्या फोटोमधील ‘ती’ गोष्ट पाहून भारतीय म्हणाले, “पंतप्रधानही एवढे मध्यमवर्गीय आहेत की त्यांना…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास कमला हॅरिस यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो पोस्ट केलं. “उपराष्ट्राध्यक्षा असणाऱ्या कमला हॅरिस यांची भेट घेऊन समाधान वाटलं. त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण जगाला प्रेरणा दिलीय. आम्ही अनेक विषयांवर बोललो ज्यामुळे भारत आणि अमेरिकेची मैत्रीपूर्णसंबंध आणखीन घनिष्ठ होतील. आमची संस्कृती आणि संस्कार यांच्यामधील साधर्म्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली,” असं मोदींनी कमला हॅरिस यांच्यासोबतच्या बैठकीचे फोटो शेअर करताना म्हटलं.

नक्की वाचा >> मोदी अमेरिका दौऱ्यावर असतानाच बायडेन यांचा भारताला मोठा धक्का; ‘या’ गोष्टीसाठी दिला नकार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र या फोटोंवर कमेंट करताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कमला हॅरिस यांनी या बैठकीचे फोटो ट्विट का केले नाहीत असा प्रश्न विचारला. “उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीसुद्धा या बैठकीचे फोटो ट्विट केलेत का? आफ्रिकन अधिकाऱ्यांसोबत नंतर झालेल्या बैठकीचे फोटो त्यांनी शेअर केलेलं मी पाहिलं. मात्र मी पाहिलंय त्याप्रमाणे त्यांनी या बैठकी आधी मोदींबरोबर झालेल्या बैठकीचे फोटो शेअर केलेले नाहीत,” असं स्वामी कमेंटमध्ये म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं भारतीयांकडून जंगी स्वागत; पाहा खास फोटो

दरम्यान या भेटीमध्ये मोदींनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांबद्दल भाष्य केलं. भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील. भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did vp kamala harris tweet about the meeting with modi asks subramanian swamy scsg