Milestone: आपण प्रवास करताना रस्त्याकडेला असणारे माइलस्टोन्स (Milestones) अर्थात् मैलाचे दगड नेहमी पाहत असतो. हे रंगेबिरंगी दगड सगळीकडेच दिसतात. या विशिष्ट आकारच्या दगडावर कोणतं गाव किती किलोमीटरवर आहे, याची माहिती दिलेली असते. मात्र, तुम्ही ते कशासाठी लावले आहेत याचा कधी विचार केला आहे का? त्याचा उपयोग कशासाठी होतो? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या रंगांच्या मैलाच्या दगडांचा अर्थ सांगणार आहोत. ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दगडांवरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ

पिवळा रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स

पिवळ्या पट्टीचा अर्थ असा की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात. एका शहातून दूसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय महार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या माहितीसूचकावर पिवळ्या रंगाची पट्टी दिसेल.

(आणखी वाचा : Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…)

नारिंगी रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स

नारिंगी रंगाची अर्थात ऑरेंज स्ट्रिप असलेले माइलस्टोन ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर असतात. ग्रामीण भागातले रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि जवाहर रोजगार योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमांतून बांधण्यात आलेले आहेत. नारिंगी रंगाचा मैलाचा दगड प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रतिनिधित्व करतो.

हिरव्या रंंगाची पट्टी असलेले माइलस्टोन

एखाद्या रस्त्यावर हिरवा मैलाचा दगड म्हणजे राज्य सरकार त्याची काळजी घेते. एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाण्यासाठी हे मुख्यतः महामार्गावर वापरले जाते. या महामार्गावर काहीही झाले तरी त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

(आणखी वाचा : Telegram Bots ने होणार तुमचे काम अधिक सोपे, तसेच होईल तुमच्या वेळेचेही बचत; जाणून घ्या कसे?)

निळ्या, काळ्या किंवा पाढऱ्या रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन

तुम्ही जर रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशासूचकावर निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची पट्टी बघितली तर शहरी किंवा जिल्हांतर्गत रस्त्यावर आहात.

झीरो माइल सेंटर

ब्रिटिशांच्या कालावधीत नागपूर शहराला झीरो माइल सेंटर म्हणून गृहीत धरण्यात आलं होतं. देशातल्या अन्य सर्व महत्त्वाच्या शहरांचं अंतर मोजण्यासाठी नागपूर हा संदर्भ बिंदू म्हणून गृहीत धरण्यात आला होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are roadside milestones of different colors the secret behind what is read in detail pdb
First published on: 05-12-2022 at 16:34 IST