कोल्हापूर : केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिली. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी १०० ई बसेसचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी १८ कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार धनंजय महाडिक यांनी केएमटीला १०० ई बसेस मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या केएमटीला केंद्र सरकारकडून १०० ई बसेस आणि त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन साठी निधी मंजूर झाला आहे. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे. त्याचे पत्र दिनांक २१ जून २०२४ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले.

हेही वाचा : फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ! काय चुकलं याचं विचार मंथन – राजू शेट्टी

कोल्हापूर मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि केएमटीला उर्जितावस्था मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला व्यापक यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार महाडिक यांनी जाहीर आभार मानले आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur 12 65 crore fund sanctioned for bus depot says dhananjay mahadik css