Ravichandran Ashwin broke Anil Kumble records in IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडची अवस्था दुसऱ्या डावात ९ बाद १७१ केली आहे. या दरम्यान रविचंद्रन अश्विनने वानखेडे स्टेडियमवर ३ विकेट्स घेत अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वानखेडे स्टेडियमवर रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी –

रविचंद्रन अश्विनसाठी ही कसोटी मालिका आतापर्यंत गोलंदाज म्हणून फारशी चांगली राहिलेली नाही, ज्यामध्ये त्याला विकेट मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. मात्र, मुंबई कसोटी सामन्यात अश्विनला किवी संघाच्या दुसऱ्या डावात रचिन रवींद्रची विकेट घेण्यात यश आले, तेव्हा तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या मैदानावर तो आतापर्यंत सर्वाधिक ४१ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. या दरम्यान अनिल कुंबळेला मागे टाकले आहे.

वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज :

  • रविचंद्रन अश्विन – ४१ विकेट्स
  • अनिल कुंबळे – ३८ विकेट्स
  • कपिल देव – २८ विकेट्स
  • हरभजन सिंग – २४ विकेट्स
  • करसन घरवी – २३ विकेट्स

हेही वाचा – IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या

अश्विनने मुंबईत आतापर्यंत घेतल्या सर्वाधिक कसोटी विकेट्स –

अश्विनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ४१ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचबरोबर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अश्विनने सर्वाधिक ४२ विकेट्स घेतल्या आहेत.