बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर स्लो-ओव्हर रेटमुळे संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाडूंना सामना मानधनाच्या ८० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. संघ निर्धारित वेळेत चार षटके मागे असल्याने आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी हा दंड ठोठावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला एक गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेश दौऱ्यातील पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला सामना मानधनाच्या ८० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, खेळाडूंना स्लो ओव्हर रेटसाठी प्रत्येक षटकाच्या त्यांच्या सामना मानधनाच्या २० टक्के दंड आकारला जातो. भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा ४ षटके मागे होता त्यामुळे हा दंड ८० टक्क्यांवर पोहोचला.

हेही वाचा  : फॉरमॅटनुसार बदलणार कर्णधार, प्रशिक्षक? राहुल द्रविडची गच्छंती? BCCI कडून हालचालींना वेग

भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपली चूक मान्य केली असून शिक्षेलाही त्याने होकार दिला आहे. त्यामुळे याबाबत औपचारिक सुनावणीची गरज नाही. मैदानावरील पंच मायकेल गफ आणि तनवीर अहमद, तिसरे पंच शरफुदौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी टीम इंडियावर हा आरोप लावला आहे.

हेही वाचा  : “ये क्या सिर्फ बारात इकट्ठी कर रहे हे”, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघ निवडीवर जडेजा संतापला

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाला एक गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला केवळ १८६ धावाच करता आल्या. केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. राहुलशिवाय एकही फलंदाज टिकू शकला नाही. इबादत होसैनने चार विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला. भारताकडून लोकेश राहुलने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास (४१) वगळता आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या. ९ बाद १३६ धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन (३८*) आणि मुस्ताफिजूर रहमना (१०*) यांनी ५१ धावांची विक्रमी भागीदारी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india fined for the third time in a row due to slow over rate 80 percent match fee cut avw
First published on: 05-12-2022 at 20:27 IST