Tilak Verma 1st T20I century during IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-२०मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात केवळ २०८ धावाच करता आल्या आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात तिलक वर्माने वादळी खेळी साकारताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याचबरोबर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावत मोठा पराक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिलक वर्माने स्फोटक फलंदाजी करताना १९व्या षटकात ५१ चेंडूत पहिले टी-२० शतक झळकावले. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. यासह तिलक वर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. वयाच्या २२ वर्षे ५ दिवसात त्याने हा पराक्रम केला. यशस्वी जैस्वाल या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. जैस्वालने वयाच्या २१ वर्षे २७९ दिवसांत नेपाळविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावून मोठी कामगिरी केली होती. टॉप-१० संघांविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तिलक हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू :

  • २१ वर्षे २७९ दिवस – यशस्वी जैस्वाल विरुद्ध नेपाळ
  • २२ वर्षे ००५ दिवस – तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
  • २३ वर्षे १४६ दिवस – शुबमन गिल विरुद्ध न्यूझीलंड
  • २३ वर्षे १५६ दिवस – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका

२२ वर्षीय तिलकने १०७ धावांच्या नाबाद खेळीत सात षटकार आणि आठ चौकार लगावले. त्याच्या खेळीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० फॉर्मेटमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याचबरोर अभिषेकने भारताला खराब सुरुवातीनंतर सावरताना२५ चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. अशा प्रकारे तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली.

वयाच्या २२ व्या वर्षी भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे खेळाडू :

कसोटी – विनोद कांबळी (२२७)
एकदिवसीय – युवराज सिंग (१३९)
टी-२० – तिलक वर्मा (१०७*)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilak verma becomes 2nd youngest player to score a t20i century for india in ind vs sa 3rd t20i at centurion vbm