कोरोना महामारीनंतर आपण इतके सावध झालो आहोत की, इकडे तिकडे हात लावला तरी लगेच धुवुन टाकतो. मात्र, तरीही आपल्या हातावर किटाणू हे असतातच. एखाद्या गोष्टीवर धुळ दिसली तर आपण स्वच्छ करतो, पण ज्या गोष्टी घाणेरड्या दिसत नाहीत त्यांच्या धोक्याची आपल्याला बिलकूल कल्पना नसते. कारण त्या आपल्या डोळ्याला तर चकाचक दिसत असतात.आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या अस्वच्छ असूनही आपल्याला दिसत नाहीत, मात्र अशा गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. दरम्यान तुम्हाला जर कोणी सांगितलं की, तुमच्या न धुतलेल्या मेकअप ब्रशमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. एका नवीन अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न धुतलेल्या मेकअप ब्रशमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया

कधीकधी ब्रश अनेक दिवस आणि आठवडे साफ केले जात नाहीत. स्पेक्ट्रम कलेक्शन्सने केलेल्या नवीन संशोधनानुसार, मेकअप ब्रश नीट साफ न केल्यास, आपल्या घरातील टॉयलेट सीटइतके बॅक्टेरिया त्यावर जमा होतात. कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले मुस्लेह यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या संशोधनात संशोधकांनी बेडरुम, मेकअप बॅग, ब्रश बॅग, ब्रश ड्रॉवर आणि बाथरूमसह वेगवेगळ्या ठिकाणी ब्रश ठेवले. २ महिन्यांनंतर समोर आलेल्या निकालानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत सर्वत्र ठेवलेल्या ब्रशमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात. स्वच्छ ब्रशमध्ये कमी बॅक्टेरिया होत्या.

हेही वाचा – साधे पाणी पिणे हा हायड्रेट राहण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे सत्य

दरम्यान ४० टक्के लोकांनी सांगितले की ते त्यांचे ब्रश २ आठवड्यात स्वच्छ करतात, तर २० टक्के लोकांचा असा विश्वास होता की ते १-२ महिन्यांनंतर स्वच्छ करतात. मात्र कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले यांच्या मते, जर ब्रश वारंवार साफ केला नाही तर, तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dirty makeup brushes have more bacteria than a toilet seat study says srk