Reuse flowers video: दसरा- दिवाळीच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे घराला तोरण बांधण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी, रांगोळीत वापरण्यासाठी आपण भरपूर झेंडूची फुले आणतो. यावर्षी तर झेंडू खूप स्वस्त होते. त्यामुळे अनेक जणांनी भरपूर फुले आणली. आता तुम्ही आणलेली फुलं जर उरली असतील आणि देवाला वाहिलेली किंवा तोरण म्हणून लावलेली फुलं सुकली असतील तर त्या फुलांचे खूप छान असे दोन उपयोग करता येतील. दिवाळीनंतर लोक ही फुले टाकून देतात, मात्र असं न करता पाण्यात सुकलेली फुलं आणि गूळ टाकून पाहा. याचा फायदा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही कधी पाण्यात सुकलेली फुलं आणि गूळ टाकून पाहिलंय का?

बऱ्याचदा मंदिरातील पुजारी सुद्धा देवावर वाहिलेले फूल प्रसाद म्हणून भाविकांना देतात. याला देवाचा प्रसाद समजून लोक घरी घेऊन येतात. पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आता या फुलांचं काय करावं? काही अशुभ होण्याच्या भितीमुळे लोक याला फेकायला सुद्धा घाबरतात. पण आता चिंता सोडा, कारण तुम्ही मंदिरातून आणलेल्या फुलांसोबत काय करावं, हे जाणून घेऊयात.

नेमकं काय करायचं?

तर या फुलांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर या झेंडूच्या किंवा अन्य फुलांना दोन लिटर पाण्यात भिजवून ठेवावे त्यानंतर त्यात थोडासा गूळ टाका. यानंतर गुळ कुसकरुन पाण्यात विरघळवा. हे झालं की हे पाणी तीन ते चार दिवस असंच ठेवून नंतर हे पाणी आपल्या झाडांवर शिंपडावे. यामुळे झांडाना नॅचरल पद्धतीने किटकनाशक मिळतं. घरच्याघरी हे एक किटकनाशक तयार करा. त्यामुळे विकत स्प्रे आणण्यापेक्षा अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही फुलांची झाडं टवटवीत करण्यासाठी हा उपाय करु शकता. झाडांवर कोणताही रोग पडलेला नसेल तरीही महिन्यातून एकदा सगळ्या रोपांवर हे पाणी शिंपडायला काहीच हरकत नाही. त्यामुळे रोपं नेहमीच चांगली टवटवीत आणि हिरवीगार राहतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Diwali 2024 : तेल नव्हे, पाण्यावर जळतात हे दिवे? या दिवाळीला वापरा पाण्यावर जळणारे दिवे, जाणून घ्या हटके जुगाड

सोशल मीडियावर @rooftop_organics नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral on social media srk