Benefits of Beetroot: बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही लोक या फळाचा रस पितात किंवा भाज्यांमध्ये घालून खातात. त्यात अनेक जीवनसत्त्वे असतात; जी शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार व सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर व जीवनसत्त्व क यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.

साधारणपणे आपण पाहतो की, लोक वसंत ऋतूमध्ये खूप आजारी पडतात. याच ऋतूमध्ये एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे थंडी सुरूच असते. हवामानातील या बदलामुळे खोकला, सर्दी, पचनशक्ती कमजोर होणे अशा समस्या येऊ लागतात. या ऋतुमानानुसार आहार आणि आरोग्य जपावे लागते. या वसंत ऋतूत तुमचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही निरोगी राहण्यासाठी बीटरूट तुम्हाला मदत करू शकते. म्हणूनच या वसंत ऋतूत तुम्ही तुमच्या आहारात बीटरूटचा समावेश करा, अशी माहिती मरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीती शर्मा यांनी दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ती सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा )

बीटरूटचे सर्वोत्तम फायदे

१. वसंत ऋतूत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जीवनसत्त्व अ, व क, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन, लोह व नैसर्गिक साखर या घटकांनी समृद्ध बीटरूट बऱ्याच वर्षापर्यंत फायदे देते.

२. पोषक घटकांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीट फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे; जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.

३. बीटमध्ये कमी कॅलरीज असतात; तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये बीटचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट खाण्यामुळे वजन वाढत नाही; तसेच त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

४. बीटरूट हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये नायट्रेट्स आढळतात; जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

. बीटरूटमध्ये आढळणारे फायबर पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट सहज पचन सुलभ करून आणि बद्धकोष्ठता टाळून निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन देते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of beetroot why you should include beets in your diet read to know more pdb
First published on: 26-02-2024 at 16:10 IST