Toothbrush Change: दररोज दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली सवय आहे. परंतु, तुम्ही या कामासाठी योग्य साधन वापरत आहात का? तुमच्या टूथब्रशची परिणामकारकता त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. डॉ. करिश्मा अॅस्थेटिक्सच्या कॉस्मेटिक दंतचिकित्सक डॉ. निशा ठक्कर यांनी याबाबत सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. ठक्कर यांनी सांगितले की, दातांमधील प्लेक, तसेच तुमच्या दात आणि हिरड्या यांच्यामध्ये अडकलेले अन्नाचे कण, त्याज्य घटक बाहेर काढता येतील अशा रीतीने टूथब्रशच्या ब्रिस्टल्सची रचना केली गेलेली असते. परंतु जीर्ण झालेले ब्रिस्टल्स दातांची व्यवस्थित साफसफाई करू शकत नाहीत. मग त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होणे आणि हिरड्यांचे आजार आदी त्रास उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.

टूथब्रश वापरण्याचा नियम काय?

डॉ. ठक्कर सामान्य नियमानुसार, दर दोन-तीन महिन्यांनी टूथब्रश बदलण्याची शिफारस करतात. ही कालमर्यादा हे सुनिश्चित करते की, तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी ब्रिस्टल्स प्रभावी राहतील.

  • टूथब्रश खराब दिसू लागणे

दोन-तीन महिन्यांपूर्वीच तुमचा टूथब्रश तुटला किंवा ब्रिस्टल्स वाकलेले दिसू लागल्यास लगेच नवीन टूथब्रश वापरण्यास सुरुवात करा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

  • आजारपणानंतर

आजारपणातून बरे झाल्यानंतर जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डॉ. ठक्कर तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना टूथब्रश बदलण्याचा सल्ला देतात. असे केल्या पुन्हा संसर्ग टाळण्यास मदत मिळते.

टूथब्रश नियमितपणे बदलण्याचे फायदे

डॉ. ठक्कर यांनी सांगितले की, टूथब्रश बदलण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून तुम्ही तुमच्या मौखिक आरोग्याचे अनेक फायदे घेऊ शकता.

  • स्वच्छता

ताजे ब्रिस्टल्स प्लेक, अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी चांगले असतात; ज्यामुळे तोंड स्वच्छ आणि निरोगी होते. तसेच दातांमधील प्लेक काढून टाकल्याने दातांमध्ये पोकळी तयार होणे आणि हिरड्यांचे रोग होण्याला प्रतिबंध होतो.

  • दुर्गंधी दूर होते

तोंड स्वच्छ झाल्यास तोंडाला दुर्गंध येत नाही. अस्वच्छता निर्माण करणारे जीवाणू कमी होतात.

तुम्ही तुमचा टूथब्रश नियमितपणे बदलत आहात याची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण सूचना खालीलप्रमाणे :

हेही वाचा: जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

  • दिनदर्शिकेवर खूण करा

दर दोन-तीन महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलला जावा यासाठी तुम्ही तुमच्या दिनदर्शिकेवर टूथब्रश वापरायला सुरुवात केल्याच्या तारखेवर खूण करून ठेवा.

  • जास्त टूथब्रश खरेदी करा

एकाच वेळी अनेक टूथब्रश खरेदी केल्याने तुम्हाला दोन-तीन महिन्यांतून टूथब्रश एकदा बदलायचे लक्षात राहील.

या माहितीचे पालन करून, तुम्ही तुमचे मौखिक आरोग्य चांगले ठेवू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it necessary to constantly change the toothbrush what do health experts say sap