hypercholesterolemia can cause of heart disease know its symptoms sign and cure | Loksatta

Hypercholesterolemia मुळे वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; रोगाची लक्षणे आणि उपचार वेळीच जाणून घ्या

हायपरकोलेस्टेरोलेमिया हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो.

Hypercholesterolemia मुळे वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; रोगाची लक्षणे आणि उपचार वेळीच जाणून घ्या
photo(freepik)

हृदयाशी संबंधित आजारांना सहसा आपली जीवनशैली कारणीभूत असते, परंतु असे काही आजार आहेत ज्यासाठी जीवनशैली नाही तर आपले कुटुंब जबाबदार आहे. अर्थात, हे थोडे विचित्र वाटेल, परंतु पालकांच्या जनुकांमुळे, मुलामध्ये काही रोग उद्भवतात, त्यापैकी एक हायपरकोलेस्टेरोलेमिया आहे.

हायपरकोलेस्टेरोलेमिया हा एक कौटुंबिक रोग आहे जो पालकांच्या जनुकातील उत्परिवर्तनामुळे होतो. ही एक गंभीर समस्या आहे ज्यामध्ये हृदयविकाराचा धोका असतो. हा आजार जन्मासोबतच होतो पण सुरुवातीला तो आढळून येत नाही. हायपरकोलेस्टेरोलेमियावर वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हायपरकोलेस्टेरोलेमिया रोगाची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपचार कसे करावे हे जाणून घेऊया.

( हे ह वाचा: Heart Health: हृदयविकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचा आहार कसा असला पाहिजे? तज्ञांकडून जाणून घ्या)

हायपरकोलेस्टेरोलेमियाची लक्षणे

  • जलद श्वास लागणे
  • डोकेदुखी
  • वजन वाढणे
  • छातीत दुखण्याची तक्रार
  • अस्वस्थता आणि मळमळ
  • सर्व वेळ थकवा
  • उच्च रक्तदाबाचा समावेश आहे.

( हे ही वाचा: पहाटेच्या वेळीच हृदयविकाराचा झटका जास्त करून का येतो? ‘या’ लोकांना वेळीच व्हावे लागेल सावध)

शरीरातील हायपरकोलेस्टेरोलेमियामुळे उद्भवणाऱ्या समस्या

हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या रुग्णामध्ये, एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल खूप जास्त होते, जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे धमन्या पातळ आणि कडक होतात. अतिरिक्त कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे काहीवेळा ते त्वचेसमोर आणि डोळ्यांसमोर जमा होऊ लागते.

डोळ्यांव्यतिरिक्त, हात, कोपर आणि गुडघ्याच्या आजूबाजूच्या नसा फुगतात ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. हाताला पेटके येऊ लागतात. उच्च कोलेस्टेरॉलमुळे डोळ्यांमध्ये कॉर्नियाचा आजार होतो. डोळ्यातील बाहुलीभोवती एक पांढरी किंवा तपकिरी रिंग तयार होते जी सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये दिसते. परंतु कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या रूग्णांमध्ये, ते तारुण्यापासून दिसू लागते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उचकी थांबवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा; लगेच मिळेल उचक्यांपासून सुटका!

संबंधित बातम्या

व्हिटॅमिन-सी समृद्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत!
Jaggery Purity : तुम्ही विकत घेतलाय तो गुळ केमिकलयुक्त आहे का? घरच्या घरी ओळखा ‘खऱ्या’ व ‘खोट्या’ गुळामधला फरक
Grahan 2022: नव्या वर्षातील सूर्य, चंद्र ग्रहणांची वेळ आणि तारीख, सुतक कालावधी जाणून घ्या
आरोग्यासाठी गुणकारी आहे अक्रोड, शरीरासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘या’ पदार्थाला ठेवतो नियंत्रणात
तुम्ही देखील तुमच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी चे सेवन करताय? यामुळे शरीरावर होणारे ४ दुष्परिणाम जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द