बच्चू कडू, राजू शेट्टीही संतप्त
परभणी : अतिवृष्टी होऊन गेली, आता शेतातला चिखल सुकला आहे असे म्हणून शेतकऱ्यांची कुचेष्टा करणारा असंवेदनशील कृषीमंत्री या राज्याला पहिल्यांदाच लाभला. एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना दुसरीकडे कृषीमंत्री परळीत सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत, त्यातले काही कार्यक्रम तर अशोभनीय आहेत अशी कडाडून टीका स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली. तर आमदार बच्चू कडू यांनीही आता सरकारच्या कानफटीत मारण्याची वेळ आली आहे असे उद्गार काढले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर लोकांचा आक्रोश असताना कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत, जरा तरी लाज वाटली पाहिजे या शब्दात राजू शेट्टी यांनीही कृषिमंत्री मुंडे यांच्यावर टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा