"...हे तर त्यांना मिळालले उत्तर!" शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान | deepak kesarkar comment over supreme court verdict on shinde group uddhav thackeray shiv sena clash | Loksatta

“…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान

खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

“…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान
उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर (संग्रहित फोटो)

खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्षावरील हक्क याबाबतची लढाई निवडणूक आयोतच लढावी लागणार आहे. असे असताना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटाला उत्तर आहे. देशातील स्वायत्त संस्थांच्या कामकाजाला आव्हान देणे चुकीचे असते. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…

आपल्या समोरचे पुरावे पाहून निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यांची याचिका फेटाळणे हेच त्यांना मिळालेले उत्तर आहे, असे त्यांनी समजून घेतले पाहिजे. भारतात निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्था आहेत. या संस्था योग्य रितीने काम करत असतात. मात्र त्यांच्या कामकाजाला आव्हान देणे हे चुकीचे असते. सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय दिला आहे. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

न्यायालयाने काय निर्णय दिला?

अखेर घटनापीठाने आज (२७ सप्टेंबर) पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गटाने याबाबत निवडणूक आयोगाची कार्यवाही रोखण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवेसना पक्षावरील प्रभुत्व तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची लाढाई आता उद्धव ठाकरे गाटाला निवडणूक आयोगातच लढावी लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?”, भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “हे सरकार…”

संबंधित बातम्या

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने, देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…
प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”
VIDEO: “ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य
Maharashtra News Live: बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक, शंभुराज देसाई संतापले; म्हणाले “सहनशीलतेला काही…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…अन्यथा जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची असेल”, महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
“दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण
प्रदर्शनाआधीच भारतात ‘अवतार २’चा जलवा, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी
Video: माझा नवरा मला… घरगुती कार्यक्रमात बेभान झाली सुनबाई; असं काही केलं की नवऱ्याने तोंडच लपवलं