माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तास्थपानेसंदर्भात सध्या सुरु असणाऱ्या बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. गोव्यामधून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे ३९ बंडखोर शिवसेना आमदारांचं समर्थन भाजपाला असल्याचं समर्थन पत्रसोबत घेऊ आले आहेत. हे पत्र राज्यपालांकडे दिलं जाणार आहे.

नक्की वाचा >> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही नेते राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सत्तास्थपानेचा आणि बहुमत असल्याचा दावा करणार आहेत. त्यानंतर आजच संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे. सध्या एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आहेत. यावेळी फडणवीसांबरोबरच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यासारखे भाजपाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.

सत्तास्थापनेचं गणित कसं…
भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्न आहे. असं झालं तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं. मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. २२ जून पाहून हे आमदार गुवाहाटीमधील ‘रेडिसन्स ब्लू’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

नक्की वाचा >> ‘शिंदेंकडे १४४ चं बहुमत नसून ५० आमदार आहेत’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “काही किती हुशार…”

३० जूनच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते काल म्हणजेच २९ जून रोजी गोव्यात दाखल झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या आमदारांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सध्या भाजपाकडे १०६ चे संख्याबळ असून ४८ आमदारांच्या मदतीने भाजपाला बहुमताचा १४५ चा आकडा सहज गाठणं शक्य आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis and eknath shinde will take oath today scsg
First published on: 30-06-2022 at 15:39 IST