शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रति सेनाभवन; मुंबईतील प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय

मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले.

शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रति सेनाभवन; मुंबईतील प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय
शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार

राज्यात भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. हे प्रतिसेना भवन नसून मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले.

हेही वाचा-“…मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?”, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार

दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईचीसी प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिसेना भवनाचे कार्यालय असेल. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सरवणकर म्हणाले.

दादरमध्येच उभारणार प्रती सेनाभवन

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेले शिवसेना भवन दादरमध्येच आहे. अशातच शिंदे गटाकडून दादरमध्येच प्रती सेनाभवन उभारण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, शिंदे गटाच्या या मुख्य कार्यालयाचे नाव काय असेल याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

हेही वाचा- ‘’भाजपात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरले आहेत’’; भास्कर जाधवांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

प्रत्येक प्रभागात उभारणार कार्यालय

आम्ही अद्याप शिवसेनेतूनच आहोत. शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले. तसेच मुंबईतील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची कार्यालय उभारण्यात येणार असून दादरमध्ये उभारण्यात येणारे कार्यालय मुख्य असल्याचेही सरवणकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दीपक केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी