दहा दिवसांच्या सत्ता संघर्षांनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाला दिला. आपल्याच पक्षातील बंडखोर आमदारांमुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. मावळ येथील शिवसैनिकांनी जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखून धरला. यावेळी भाजपाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच फडणवीसांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, म्हणाले “त्यांनी हिंमत…”

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळं शिवसेनेत उभी फूट पडली होती. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी भाजप सोबत युती करावी, अशी मागणी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, उद्धव ठाकरे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी शिंदे गटाला मुंबईत या मग त्यावर विचार करु, असे सांगितलं. परंतु, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील इतर आमदार हे मुंबईला यायला तयार नव्हते. अखेर राज्यपालांच्या एन्ट्रीनंतर महाविकास आघाडीकडीने बहुमत सिद्ध करण्याअगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.

पाहा व्हिडीओ –

राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, मावळ मधील शिवसैनिकांनी आक्रमक होत जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळून महामार्ग रोखून धरला. यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला होता. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena workers agitation on old mumbai pune highway after uddhav thackeray resignation url kjp dpj