शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? मी साक्षीदार आहे म्हणत एकनाथ शिंदेंचं विधान!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

eknath shinde raj thackeray
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड येथील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या हातानेच स्वत:चा पक्ष कसा संपवला? याची अनेक कारणं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासह आपल्याला पक्षातून बाहेर का पडावं लागलं? यावरून एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते? जिथे शिवसेना नाही. जिथे शिवसेना कमजोर आहे, तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो आणि मोठी करतो. नारायण राणेंचा काय गुन्हा आहे? त्यांच्या बाबतीत काय झालं? राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात, आमच्याशी बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती. आता आम्ही मोकळे आहोत. आमच्यात विचारांचं अदान प्रदान होतं, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं.

हेही वाचा- “योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो” भरसभेतून उदय सामंतांची कबुली

एक आठवण सांगतो म्हणत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “जेव्हा ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती. तेव्हा मी राज ठाकरेंच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं की हा भगवा बाळासाहेब ठाकरेंनी फडकवला आहे. आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली फडकला आहे, हा भगवा उतरू देऊ नका. तेव्हा राज ठाकरेंनी आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. यात आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला.”

हेही वाचा- “उद्धवजी, ते तुमचा कधी गळा दाबतील, हे…”, अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचं विधान

योगेश कदमांनी तुमचं काय घोडं मारलं- एकनाथ शिंदे

योगेश कदमची राजकारणात सुरुवात झाली आहे. त्यानं तुमचं काय घोडं मारलंय? त्यानं तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही त्याचं राजकारण संपवायला का निघालात. तुम्ही दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्या, याचा साक्षीदार मी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 22:03 IST
Next Story
Video: “मी पालघरला प्रचारासाठी निघालो तेव्हा आई आजारी होती, डॉक्टरचा फोन आला…”, एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!
Exit mobile version