हा शरद पोंक्षे तूच ना? जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी केला सवाल

शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदेसाठी एक पोस्ट शेअर केली होती.

aadesh bandekar sharad ponkshe eknath shinde
शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदेसाठी एक पोस्ट शेअर केली होती.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. यासगळ्यात अभिनेता शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांना न कळत एक पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला होता. तर यावर आता आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना सवाल केला आहे.

आणखी वाचा : अँबर हर्ड प्रकरणानंतर Disney ने मागितली जॉनी डेपची माफी, २ हजार कोटींची दिली ऑफर

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शरद पोंझेंनी दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पोंक्षेंनी २०१९ साली लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कर्करोगाच्या लढ्याविषयी सांगितले होते. या व्हिडीओ शरद पोंक्षें म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” हा व्हिडीओ शेअर करत “हा शरद पोंक्षे तुच ना?” असा सवाल आदेश बांदेकर यांनी केला आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : आलियाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर तैमूरला आलं टेन्शन

काय म्हणाले होते शरद पोंक्षे?

शरद पोंक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक दिसतं आहे. तर यासोबतच त्याच्या पाठी शरद पोंक्षें यांच्यासोबत एकनाथ शिंदे दिसत आहेत. या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे लिहिले आहे.

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

ही पोस्ट शेअर करत “कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aadesh bandekar shares an old video of sharad ponkshe on eknath shinde post dcp

Next Story
कोणी म्हटलं ‘मोटा भाई’ तर कुणी ‘वडापाव’, वाढलेल्या वजनामुळे अल्लू अर्जुन ट्रोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी