Premium

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म

आकांक्षा दुबेच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म, आरोपींची डीएनए चाचणी होणार

akanksha-dubey
दिवंगत आकांक्षा दुबे (संग्रहित फोटो)

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा मृतदेह २६ मार्च रोजी वाराणसीतील एका हॉटेल रूममध्ये सापडला होता. तिच्या निधनानंतर तिचा कथित बॉयफ्रेंड समर सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. समर सिंहने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही अभिनेत्रीच्या आईने केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशातच आकांक्षाच्या मृत्यूबद्दल एक नवीन बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत

आकांक्षा दुबेने आत्महत्या केली तेव्हा तिने परिधान केलेल्या कपड्यांची तपासणी करण्यात आली असून या अहवालात अनेक खुलासे झाले आहेत. आकांक्षाच्या अंडरगारमेंटमध्ये स्पर्म आढळले आहेत. हा धक्कादायक रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी समर सिंह आणि संजय सिंह यांच्यासह आणखी चार जणांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे डीएनए चाचणीची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.

रणदीप हुड्डाने वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कमी केलं तब्बल २६ किलो वजन; फक्त ग्लासभर दूध अन्…

आकांक्षा दुबे प्रकरणातील आरोपी समर सिंह, संजय सिंह, संदीप सिंह आणि अरुण पांडे यांचे डीएनए नमुने पोलीस घेणार असून पुढील तपास करणार आहेत. अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर सिंह आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. तर, आकांक्षा शेवटची संदीप सिंहसोबत दिसली होती. आत्महत्येपूर्वी अभिनेत्री एका पार्टीतून परतली होती, त्यावेळी संदीप सिंह तिला सोडायला हॉटेलमध्ये आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akanksha dubey suicide case sperm found on her clothes dna test of samar singh hrc