Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai: मागच्या बऱ्याच काळापासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यातील दुराव्याच्या व घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai Bachchan) अभिषेक बच्चनचे घर सोडले असून ती आई व मुलीबरोबर वेगळी राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. या घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलं आहे. अभिषेकचा एक एआयच्या मदतीने बनवलेला बनावटी व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या व ऐश्वर्याच्या घटस्फोटाची पुष्टी करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांना तो खरा वाटला, पण तो बनावटी असल्याचं नंतर समोर आलं. आता अभिषेकने बोटातील अंगठी दाखवत अजूनही विवाहित असल्याचं म्हटलं आहे. “मी धूममध्ये किसिंग सीन केला तेव्हा…”, ऐश्वर्या रायने हृतिक रोशनबरोबरच्या सीनवर दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया घटस्फोटाच्या वृत्ताबद्दल अभिषेक बच्चन म्हणाला… 'बॉलीवूड यूके मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेकने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवून या अफवांवर प्रतिक्रिया दिली. "मी अजूनही विवाहित आहे. या अफवांबद्दल माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काहीही नाही. या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर अतिशयोक्ती करून सांगितल्या जात आहेत, हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करता हे मला कळतंय. तुम्हालाही काही बातम्या कराव्या लागतात. ठिक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे आम्हाला या गोष्टीला सामोरं जावं लागणार," असं अभिषेक बच्चन म्हणाला. तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले… ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू होत्या. दोघांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे, ते दोघेही वेगळे राहतात पण मुलीचा सांभाळ एकत्र करतात, अशा अनेक बातम्या आल्या. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय मुलीबरोबर आली होती. तर अभिषेक आई-वडिलांबरोबर आला होता. त्यानंतर त्यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल खूप बोललं गेलं. ते विभक्त झाले आहेत, असंही म्हटलं गेलं. पण या निव्वळ अफवा असल्याचं आता अभिषेक बच्चनने स्पष्ट केलं आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन सोभिताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच समांथाच्या चाहत्यांनी केलं ट्रोल; नागा चैतन्यला म्हणाले, “इतक्या लवकर आयुष्यात…” ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न २००७ मध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते. या दोघांच्या लग्नाला १७ वर्षे झाले असून त्यांना आराध्या नावाची १२ वर्षांची मुलगी आहे. मागच्या काही काळापासून ऐश्वर्या आराध्याबरोबरच एअरपोर्ट किंवा कोणत्याही इव्हेंटला दिसते, तर अभिषेक बच्चन आई-वडिलांबरोबर दिसतो, त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा होत्या. पण ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात सगळं आलबेल आहे असं त्याने आता एका मुलाखतीत सांगितलं आहे. परिणामी आता सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.