अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ईशा कोप्पीकरने ‘फिझा’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘इश्क समुंदर’ कंपनीतील ‘खल्लास’ यांसारख्या आयटम साँगमध्ये काम केल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत टाईपकास्ट होण्याविषयी ईशाने मत मांडलं आहे. तसेच इंडस्ट्रीतील तिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल बोलताना ईशा भावुक झाली.

ईशाने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारण्यात आलं की आयटम नंबर्सनंतर टाईपकास्ट झाल्यावर तिने निर्मात्यांकडून कधीतरी महत्त्वाच्या भूमिका मागितल्या का? यावर ईशा म्हणाली, “हे कधीच तुम्ही काय करू शकता याबद्दल नव्हतं. हे सगळं हिरो ठरवायचे. तुम्ही #MeToo बद्दल ऐकलं असेलच, जर तुम्ही मुल्यांवर जगत असाल तर तुमच्यासाठी या इंडस्ट्रीत काम करणं खूप अवघड आहे. माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. एकतर त्या मुलींनी हार मानली किंवा त्यांना जे करण्यास सांगण्यात आलं ते त्यांनी केलं. अशा खूप कमी आहेत ज्या अजूनही इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांनी हार मानली नाही आणि मी त्यापैकी एक आहे.”

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

१८ व्या वर्षी ईशाला कास्टिंग काउचचा भयानक अनुभव आला होता. “मी १८ वर्षांची असताना एका सेक्रेटरी आणि एका अभिनेत्याने कास्टिंग काउचसाठीसाठी अप्रोच केलं. त्यांनी मला सांगितलं की काम मिळवण्यासाठी तुम्हाला अभिनेत्यांशी ‘फ्रेंडली’ राहावं लागेल. मी खूप फ्रेंडली आहे, पण ते जे म्हणत होते ते ‘फ्रेंडली’ म्हणजे काय? मी इतकी फ्रेंडली आहे की एकता कपूरने मला एकदा थोडा अॅटिट्यूड ठेवण्याचा सल्ला दिला होता,” असं ईशा म्हणाली.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

एका ए-लिस्ट अभिनेत्याने तिला एकटं भेटायला बोलावलं होतं, तो प्रसंग ईशा कोप्पीकरने सांगितला. ईशा म्हणाली, “मी २३ वर्षांची असताना एका अभिनेत्याने मला माझ्या ड्रायव्हरशिवाय किंवा इतर कुणालाही सोबत घेतल्याशिवाय त्याला एकटं भेटायला बोलावलं, त्यावेळी त्याचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं जात होतं. तो म्हणाला, ‘माझ्याबद्दल आधीच कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत आणि कर्मचारी अफवा पसरवतात.’ पण मी त्याला नकार दिला आणि त्याला सांगितलं की मी एकटी येऊ शकत नाही. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील ए-लिस्ट अभिनेता होता.”

ट्रेनमध्ये पहिली भेट अन् लग्नाचा निर्णय, आजही पतीपासून दूर राहतात अलका याज्ञिक; वाचा हटके लव्ह स्टोरी

अभिनेते आणि दिग्दर्शकांचे सेक्रेटरी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे, तेही ईशाने सांगितलं. “ते येऊन तुम्हाला फक्त चुकीच्या पद्धतीने स्पर्शच करायचे नाहीत, तर ते हात पिळून म्हणायचे, ‘तुला अभिनेत्यांशी मैत्री करावी लागेल,” असं ईशा म्हणाली.

ईशा कोप्पीकर शेवटची तामिळ चित्रपट ‘अयलान’मध्ये दिसली होती. ईशा काही महिन्यांपूर्वी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. तिने पती टिमी नारंगपासून घटस्फोट घेतला आहे.