Premium

कतरिना कैफने चित्रपटाचे कौतुक केल्यावर विकी कौशल झाला रोमॅंटिक; पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाचे कतरिना कैफने केले कौतुक; पत्नीचे रोमॅंटिक स्टाईलने आभार मानत विकी कौशल म्हणाला…

actress katrina kaif and vicky kaushal
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, विकी कौशलच्या चित्रपटाचे पत्नी कतरिनाने विशेष कौतुक करीत खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’वर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बीना पॉल यांची सडकून टीका; म्हणाल्या, “तथ्यहीन, चुकीचा चित्रपट…”

कतरिनाने विकी कौशलच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून, चित्रपटाचे कौतुक करताना अभिनेत्रीने लिहिले, “तुम्ही हा चित्रपट खूप मनापासून आणि सुंदररित्या बनवला आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन… ” पत्नीने केलेल्या कौतुकाला विकीने अगदी रौमॅंटिक स्टाईलने उत्तर दिले आहे. ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातील “तू है तो मुझे फिर और क्या चाहिये…” या रोमॅंटिक गाण्याच्या काही ओळी लिहित विकीने कतरिनाला धन्यवाद म्हटले आहे.

हेही वाचा : तुर्कीला जाऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने का नेसली साडी? पोस्ट शेअर करत सांगितले कारण…

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांशिवाय चित्रपटात इनामुलहक, शारीब हाश्मी, राकेश बेदी आणि सुष्मिता मुखर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, अभिनेका विकी कौशल लवकरच बहुचर्चित सॅम बहादूर चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तर, कतरिना कैफ सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्याबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Katrian kaif praised vikcy kaushal zara hatke zara bachke actor movie actor replied in romantic style sva 00