अभिनेता सुनील शेट्टीने त्याचे वडील विरप्पा शेट्टी यांच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे. त्याचे वडील अवघ्या नवव्या वर्षी कर्नाटकमधील मंगळुरू इथून घरातून पळून मुंबईला आले होते. याठिकाणी त्यांनी मुंबईत वेटरचं काम केलं आणि हळूहळू याच क्षेत्रात रुळले. सुनीलचे वडील सुरुवातीला हॉटेलमध्ये टेबल पुसायचं काम करायचे आणि नंतर ते रेस्टॉरंट मॅनेजर झाले आणि शेवटी ते त्याचे मालक झाले. त्याच्या वडिलांनी केटरिंग क्षेत्रात ज्या तीन इमारतींमध्ये काम केलं होतं, त्या तिन्ही इमारतींचा मालक आता सुनील शेट्टी आहे.

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याशी त्यांच्या पॉडकास्टवर गप्पा मारताना सुनील म्हणाला, “माझे वडील लहानपणी पळून मुंबईत आले. त्यांना वडील नव्हते, त्यांना फक्ते तीन बहिणी होत्या. त्यांना वयाच्या नवव्या वर्षी एका दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम मिळालं. आपल्या समाजात हीच गोष्ट खास आहे की आपण एकमेकांना आधार देतो. माझ्या वडिलांचं पहिलं काम टेबल साफ करणं हे होतं. ते इतके लहान होते की त्यांना तो टेबल पूर्ण साफ करण्यासाठी एकाच टेबलच्या चार फेऱ्या कराव्या लागायच्या. ते भाताच्या पोत्यावर झोपायचे.”

बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती

सुनीलचे वडील नंतर बरीच वर्षे तिथे काम करत राहिले, एकवेळ अशी आली की ते मालकाच्या तिन्ही इमारती सांभाळू लागले. “माझ्या बाबांच्या बॉसने तीन इमारती विकत घेतल्या आणि त्या माझ्या बाबांना सांभाळायला सांगितलं. बॉस निवृत्त झाल्यावर बाबांनी तिन्ही इमारती विकत घेतल्या. आजही माझ्याकडे तिन्ही इमारती आहेत आणि तिथूनच आमचा प्रवास सुरू झाला.” वडिलांच्या तुलनेत आपण काहीच केलं नाही, असं सुनील म्हणाला.

“त्याने मला सोडलं आणि पुन्हा लग्न केलं”, ट्रोल करणाऱ्याला प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीने सुनावलं

सुनील शेट्टीने ३२ वर्षांपूर्वी १९९२ साली अभिनयात पदार्पण केलं. त्यापूर्वी सुनीलने वडिलांबरोबर केटरिंग व्यवसायात अनेक वर्षे काम केलं होतं. “माझे बाबा खूप नम्र होते, पण जर कोणी त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही बोलले तर ते खूप चिडायचे. ते एकच डायलॉग बोलायचे, ‘मी सगळं काही विकून टाकेन आणि माझ्या गावी परत निघून जाईन, पण अन्याय सहन करणार नाही,'” अशी आठवण सुनीलने सांगितली. सुनीलचे वडील विरप्पा शेट्टी यांचं सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये निधन झाले.