सध्या जुन्या चित्रपटांचा रिमेक करण्याची प्रथा सुरु झाली. बॉलिवूडची सर्जनशीलता संपली का? असा थेट सवाल टीकाकारांनी बॉलिवूडच्या मंडळींना केला. आजकालच्या हिंदी चित्रपटांमध्ये गाणी देखील जुन्या चित्रपटातील एखाद्या गाण्यांवरून घेतलेली असतात. सनी लियोनच्या मधुबन मै राधिका या गाण्यावरून बराच वाद झाला होता. मूळ गाणे हे दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झाले होते. जुने गाणे शास्त्रीय संगीतावर आधारलेले होते. हिंदीनंतर आता मराठीत देखील हा प्रयोग होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टकाटक २ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अजिंक्य राऊत या अभिनेत्याच्या किसिंग सीनवरून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. मन उडू उडू झालं या मालिकेत तो दिसला होता. आता याच चित्रपटातील एक गाणे आले आहे त्या गाण्याचं नाव आहे हृदयी वसंत फुलताना, तब्बल ३४ वर्षांपूर्वी आलेल्या अशी ही बनवा बनवी या अजरामर चित्रपटातील हे गाणे ४ अभिनेते आणि ४ अभिनेत्रींनवर चित्रित झाले होते. आजही जुने गाणे अनेकांच्या ओठी आहे.

‘आमचे पैसे थोडीच… ‘ फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूडच्या चित्रपटांवर तब्बूने दिली प्रतिक्रिया

नव्या रंगात, नव्या ढंगात सादर आहे सदाबहार गाणं, ‘हृदयी वसंत फुलताना’ एका अनोख्या अंदाजात!!! असा कॅप्शन देऊन हे गाणे प्रदर्शित केले आहे. वरून लिखाते यांनी नव्या गाण्याला संगीत दिल आहे तर श्रुती राणे यांनी ते गायले आहे. एलेनाझ नोजुरी हिच्यावर गाणे चित्रित झाले आहे तर चित्रपटातील इतर कलाकार देखील गाण्यात दिसत आहेत.

‘टकाटक २’ ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrudayi vasant fultana song remade in takatak 2 marathi movie spg