‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं नवं पर्व आता सुरु झालं आहे. काही दिवसांसाठी या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. नम्रता संभेराव, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, प्रभाकर मोरे, अरुण कदम यांच्याबरोबरच तरुण पिढीतील काही कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे नावारुपाला आले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये ती यशस्वी ठरली. कार्यक्रमामध्ये ती एकापेक्षा एक अतरंगी पात्र साकारताना दिसते. तिच्या विनोदाने आता सगळ्यांना भूरळ घातली आहे. शिवाली उत्तम विनोदी कलाकार तर आहेच. पण त्याचबरोबरीने तिचा प्रत्येक लूकही प्रेक्षकांना आवडतो.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिवाली नवनवीन लूकमध्ये फोटोशूट करत असते. शिवालीचे वेस्टर्न तसेच पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. आता तर तिने चक्क ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिच्या या नव्या लूकचीच सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.
शिवालीने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं. यामध्ये तिचा बोल्ड लूक दिसत आहे. तसेच यादरम्यान तिने विविध पोझ देखील दिला. शिवालीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या मनमोहक लूकचं भरभरून कौतुक केलं आहे.