marathi writer kshitij patwardhan shared post for editor ravish kumars resigantion from NDTV spg 93 |"आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम..." रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट | Loksatta

X

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट

रवीश कुमार हे गेल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होते

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर सध्या समाजमाध्यमात यावरून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मराठीतील प्रसिद्ध गीतकार, लेखक क्षितिज पटवर्धनने यावर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

क्षितिज पटवर्धन सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे, चित्रपटांचे तो नेहमीच कौतूक करत असतो. तसेच तो सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. पोस्टमध्ये त्याने असं लिहलं आहे, “रवीश कुमारची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा सौम्य आणि लोभस प्रांजळपणा. आकांड तांडव रहित सत्य सांगण्याची हातोटी. सवंग लोकप्रियतेसाठी स्वतःची न सोडलेली मर्यादा, आक्रमक असूनही आक्रस्ताळी नसलेली मांडणी, त्यामुळेच noise वाढवणाऱ्या लोकांमध्ये तो कायम voice वाटत राहील!!” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रवीश कुमार हे गेल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होते. १९९६ साली पहिल्यांदा ते एनडीटीव्हीच्या संपर्कात आले. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजाकडून मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:45 IST
Next Story
लाडक्या राहाला पहिल्यांदा भेटण्यासाठी तैमूर आतुर; ‘या’ दिवशी होणार भावा-बहिणीची भेट