आज छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका आहेत, पण कुठेतरी सर्व मासिकांचा आशय सासू- सूनांच्याभोवती फिरतो. कदाचित यामुळेच कोणताही शो प्रेक्षकांवर जादू करण्यात काही प्रमाणात अपयशी ठरला आहे. पूर्वी रामायण, महाभारत आणि शक्तीमान सारख्या मालिकादेखील होत्या, ज्यांची प्रेक्षकांवर इतकी प्रचंड पकड होती की संपूर्ण कुटुंब टीव्हीसमोर बसून या मालिका पाहत असे. लोक या मालिका मनापासून पाहायचे. दरम्यान, आता ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी सासू-सूनांच्या मालिकांबद्दल आपलं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश खन्ना त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतीच त्यांनी सासू- सूनांच्या मालिकांबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी निर्माती एकता कपूरवर संताप व्यक्त केला असून या सासू- सूनांच्या मालिकांनी संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. मुकेश खन्ना यांची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा- Video : “मोगॅम्बो कभी खुश नहीं होगा क्योंकि…” Bigg Boss 16 चा नवा प्रोमो चर्चेत

टीव्हीवरील सासू- सूनांच्या मालिकांबद्दल बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, “सॅटेलाइट टीव्हीचा सॅच्युरेशन पॉइंट आला आहे. प्रत्येकजण फक्त एकमेकांची नक्कल करत आहेत. टिकली, झुमका, हार, साडी, लहंगा, सासू, सून, नणंद, वहिनी आणि मुलींचे साम्राज्य सुरू आहे. सर्व चॅनेलची हीच स्थिती आहे. प्रत्येक मालिकेत कलाकार क्रूर भाव घेऊन फिरत असतात. मी काही वर्षांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेने टीव्ही जगताचा सत्यानाश केला आहे.” अर्थात सर्वांना माहीत आहे की ही मालिका एकता कपूरची होती.

आणखी वाचा- “ते आदाब करत आहेत की, बर्बाद..”; पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन मुकेश खन्नांची बॉलिवूड स्टार्सवर जोरदार टीका

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “सासू आणि सून यांच्या या मालिकांमध्ये टीव्ही कुठेतरी हरवला आहे. दुःखद, पण हे खरे आहे. काहीतरी नवीन करण्याची आणि विचार करण्याची गरज आहे.” मुकेश खन्ना सांगतात की, “मी पंकज बेरी यांचे एक विधान वाचले होते, ज्यामध्ये त्यांनी सासू- सूनांच्या मालिकांमध्ये टीव्ही कुठेतरी गायब झाल्याचे म्हटले होते. हे वाचून कुठेतरी बरं वाटतंय. कारण मी ही गोष्ट काही वर्षापूर्वीच बोललो होतो.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh khanna angry reaction on ekta kapoor serials says it destroy tv industry mrj