scorecardresearch

Video : “मोगॅम्बो कभी खुश नहीं होगा क्योंकि…” Bigg Boss 16 चा नवा प्रोमो चर्चेत

बिग बॉस १६ च्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खान मोगॅम्बोच्या अवतारात दिसतोय.

Video : “मोगॅम्बो कभी खुश नहीं होगा क्योंकि…” Bigg Boss 16 चा नवा प्रोमो चर्चेत
निर्मात्यांनी आता शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ प्रसारित केला आहे.

टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. सलमान खान होस्ट करत असलेला हा टीव्ही शो गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि यावर्षी शोचा १६ वा सीझन प्रसारित होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निर्मात्यांनी अनेक नवीन गोष्टी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सीझनमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या शोमध्ये स्वतः बिग बॉसची एंट्री.

निर्मात्यांनी आता शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ प्रसारित केला आहे ज्यामध्ये सलमान खान मोगॅम्बो अवतारात दिसत आहे. यापूर्वी निर्मात्यांनी सलमान खानला गब्बरच्या लूकमध्येही दाखवले होते. प्रत्येक नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये निर्माते सलमान खानला नवीन खलनायकाच्या रूपात दाखवत आहेत. हा प्रोमो व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ‘प्रत्येकाचा गेम फेल होईल. जेव्हा बिग बॉस स्वतः हा खेळ खेळण्यासाठी येतील.’

आणखी वाचा- Bigg Boss 16: MeToo प्रकरणामध्ये अडकलेला ‘हा’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वामध्ये दिसणार? चर्चांना उधाण

नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, “मोगॅम्बो आता कधीच खूश होणार नाही कारण आता सगळ्यांना बिग बॉसची भीती वाटेल. बिग बॉस सीझन १६, आता खेळ बदलणार आहे. कारण आता बिग बॉस स्वतः खेळणार आहे.” मात्र आता हा बिग बॉस म्हणजे नेमकं कोण असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बिग बॉस आत्तापर्यंत फक्त एका आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

आणखी वाचा- “मला उलटी…” नेहा कक्करच्या ‘पायल है छनकाई’ रिमेकवर फाल्गुनी पाठकची पहिली प्रतिक्रिया

बिग बॉस हा शो सुरू झाल्यापासून अद्याप प्रेक्षकांनी बिग बॉसचा चेहरा पाहिलेला नाही. सर्वांना केवळ बिग बॉसचा आवाज माहीत आहे. त्यामुळे बिग बॉस सलमान खानच आहे का? किंवा शोमध्ये बिग बॉस म्हणून लॉन्च होणारा कोणी स्पर्धक असेल. असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहेत. शो संबंधित अनेक रहस्ये आहेत जी लवकरच उघड होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या