उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. आपल्या आगामी कामाविषयी तसेच चालू घडामोडींविषयी परखड मतं मांडतं असतात. अनेकदा यामुळे ट्रोलही होतात. सध्या अमृता फडणवीस त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

काल, रामनवमी निमित्ताने अमृता फडणवीस यांचं एक गाणं प्रदर्शित झालं. ‘हे राम’ असं या गाण्याचं नावं आहे. या गाण्यासाठी अमृता यांना साथ प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या गाण्यातील काही भाग सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण या गाण्यातील अमृता फडणवीसांना आवाज ऐकून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. “मामींना ऑस्कर देण्यात यावा”, “नका ना मामी”, “हे राम, वाचवं आमचे कान”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अमृता फडणवीसांच्या पोस्टवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे राम, आताच झोपेतून उठले होते, आता परत झोपते.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कशाला वाट लावता मामी देवाच्या नावाची.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मामी अतिशय भयानक, लहान लहान लेकरं फॉलो करतात तुम्हाला, घाबरतील हो.”

हेही वाचा – Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह प्रसाद ओक-मंजिरी ओकचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा बघाच

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १००हून अधिक जणांनी लाइक केलं आहे.