या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत. तुम्ही त्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या काही उत्तम कलाकृती कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतील ते जाणून घेऊयात.

ब्रिजर्टन 3

यावेळी कॉलिन ब्रिजर्टन आणि पेनेलोपी फेदरिंग्टन यांची प्रेमकहाणी संपणार आहे. या सीरिजचे आतापर्यंत चार एपिसोड रिलीज झाले आहेत, ज्यामध्ये दोघांमधील गुपितं उघड होताना पाहायला मिळतात. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

दोन लग्नं, घटस्फोट अन् दुसऱ्या पतीवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप; ३७ वर्षीय अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत

गांठ

‘गांठ’ ही वेब सीरिज ऑफिसर गदर सिंगची गोष्ट सांगते. दिल्लीत घडलेल्या एका प्रकरणाची उकल तो कसा करतो, यावर बेतलेली ही सीरिज आहे. ही तुम्हाला जिओ सिनेमावर पाहता येईल.

दो और दो प्यार

विद्या बालन, प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूज यांचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, पण त्याला फारसं यश मिळू शकलं नाही, त्यामुळे आता तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट पळून लग्न करणाऱ्या एक जोडप्यावर आधारित आहे. लग्नानंतर काही वर्षांनी ते दोघे दुसऱ्यांच्या प्रेमात पडतात आणि मग त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात, त्या यात पाहायला मिळतात.

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

लव्ह की अरेंज्ड मॅरेज

अवनीत कौर, सनी सिंह, अन्नू कपूर आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका ‘लव्ह की अरेंज्ड मॅरेज’ हा चित्रपट झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे. यामध्ये लव आणि इशिकाचे आई-वडील विधवा असतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

ॲक्शन, सस्पेन्स अन् ड्रामा चित्रपट आवडत असतील, तर नक्की वाचा ‘ही’ यादी, सर्व सिनेमे ओटीटीवर येणार पाहता!

प्रेझ्युम्ड इनोसंट

‘प्रेझ्युम्ड इनोसंट’ चित्रपट ॲपल टीव्हीवर प्रदर्शित झाला आहे. हा एक लीगल थ्रिलर चित्रपट आहे. सहकाऱ्याच्या हत्येचे आरोप लागल्यानंतर त्यातून मुक्त होण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नावर आधारित हा चित्रपट आहे.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

द फॉल गाय

‘द फॉल गाय’ हा ॲक्शन कॉमेडी चित्रपट एका अशा माणसावर आधारित आहे जो अपघातानंतर स्टंटमॅन म्हणून आपलं यशस्वी करिअर सोडून देतो. मग तो सेटवर कसा परततो ही या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.