सलमान खानने चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चांवर शहनाजने सोडलं मौन, म्हणाली “मी याचा भाग…”

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि शहनाज गिल यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु आहे.

सलमान खानने चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चांवर शहनाजने सोडलं मौन, म्हणाली “मी याचा भाग…”
सलमान खान, शहनाज गिल,

‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र या चित्रपटाशी संबंधित अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि शहनाज गिल यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे सलमानने तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच शहनाज गिलने या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल ही फार खचली होती. तिचे कुटुंबिय, मित्र आणि इतरांनाही तिची अवस्था पाहून अश्रू अनावर झाले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल ही सावरताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रीय असते. नुकतंच शहनाजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिले आहे.

Sidharth Shukla Birthday: “तू मला उद्धवस्त…”, शहनाजविषयी सिद्धार्थने केलेलं ‘ते’ वक्तव्य पुन्हा चर्चेत

गेल्या आठवड्यापासून सातत्याने अशाप्रकारच्या अफवा पसरत आहेत. पण या सर्व अफवा माझ्या मनोरंजनासाठी रोजच्या आहेत. मी हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे. तो पाहण्यासाठी मी अजून काही वेळ प्रतीक्षा करु शकत नाही. तसेच मी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे, असे शहनाजने म्हटले आहे.

शहनाझ गिलचं सलमान खानशी बिनसलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी शहनाजला चित्रपटातून काढून टाकल्याचं वृत्त समोर आलं होतं. सलमान आणि शहनाज यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं जात होतं. तसेच चित्रपटातून बाहेर पडताच शहनाझने राग व्यक्त करत सलमान खानला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र यात काहीही तथ्य नसून या सर्व अफवा असल्याचे समोर आलं आहे.

शहनाझने या वर्षाच्या सुरुवातीला ‘कभी ईद कभी दिवाळी’चे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटातून राघव जुयाल सुद्धा शहनाजसोबतच बॉलिवूड पदार्पण करत आहे. तसेच पलक तिवारी आणि सिद्धार्थ निगम यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शहनाझ गिलचं सलमान खानशी बिनसलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी