प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांचे मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. ‘वॉईज ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…, हम रहे या ना रहे कल…, यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज २ जून ‘केके’ च्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘केके’ लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गाणी गात होता. मात्र त्यानंतर अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली. केकेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही आढळल्या आहेत. ‘केके’च्या मृत्यूनंतर अनेक दावे केले जात आहे. नुकतंच ‘केके’चा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ‘ई टाईम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

‘केके’च्या शवविच्छेदन अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार ‘केके’चा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, ‘केके’चा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसांची स्थिती फारशी चांगली नव्हती, असेही बोललं जात आहे.

“मलाही अशाचप्रकारे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मरण यावं…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

‘केके’ने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. पण ‘केके’ ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. ‘केके’ याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. ‘केके’ यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer kk postmortem report singer was suffering with chronic liver and lungs disorder dies due to cardiac arrest nrp