‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सध्या गौरव हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये पाहायला मिळत आहे. हास्यजत्रा सोडून गौरव हा हिंदी कॉमेडी शो करत असल्यामुळे ट्रोलर्स सतत त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. पण ट्रोलर्सना गौरव सडेतोड उत्तर देत आहे. अशातच गौरव मोरेने ओंकार भोजने, भाऊ कदमसह काही कलाकारांनी खास भेट घेतली. या भेटीचा फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला असून तो फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. पण गौरवने अचानक ओंकारे भोजने, भाऊ कदम यांची भेट का घेतली? यामागचं कारण नेमकं काय आहे? जाणून घ्या…

अभिनेता गौरव मोरेने काही तासांपूर्वी खास भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरवसह ओंकार भोजने, स्नेहल शिदम, सूपर्णा श्याम पाहायला मिळत आहेत. गौरव व ओंकारला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. “ओंकार आणि गौरव एका फ्रेममध्ये वाह वाह…”, “ओंकार आणि गौरव एक नंबर”, “ओंकार आणि गौरव माझे आवडते कलाकार आहेत”, “ओंकार आणि गौरवला एकत्र पाहून माझा दिवस सार्थकी लागला…खूप मस्त”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या फोटोवर दिल्या आहेत.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास

हेही वाचा – अंबानी कुटुंबातील ‘या’ सूना पतीपेक्षा वयाने आहेत मोठ्या; होणारी सून राधिका मर्चंट ३० वर्षांची तर अनंत…

लवकरच गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात गौरव महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्या साथीला अभिनेते मकरंद देशपांडे, सक्षम कुलकर्णी पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गौरव, मकरंद देशपांडे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानिमित्ताने गौरवची ओंकार भोजने, भाऊ कदम यांच्यासह इतर कलाकारांशी खास भेट झाली.

हेही वाचा – भाड्याच्या घरात राहणाऱ्या मराठमोळ्या अदिती द्रविडने चार वर्षांत मुंबईत घेतलं हक्काचं घर, खडतर प्रवास सांगत म्हणाली…

दरम्यान, गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटातही झळकणार आहे. याआधी ‘अंकुश’, ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’, ‘सलमान सोसायटी’ या चित्रपटांमध्ये गौरव पाहायला मिळाला होता.