मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच सिद्धार्थच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सिद्धार्थने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने महाराष्ट्रातील काही पारंपारिक पदार्थांबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “आमचं सर्व मार्गी लागल्यावर…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं आईचं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाला “तिला कितीही वेळ…”

“आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा किंवा शेव भाजीचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा, मिरची धणे आणि लसणाचा ठेचा आणि शेवटी घट्ट झालेली शेवयाची खीर. बास. पुरेसं आहे”, असे सिद्धार्थने यात म्हटले आहे.

सिद्धार्थने या फोटोला ‘अजून नको काही’ असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच त्याने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. या फोटोवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. “आनंद हा मान्यात असतो… मग ती आईच्या हातची चटणी भाकरी पण चालेल”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “भूक लागली राव पोस्ट बघून”, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “…मग घर कसं होईल?” कुटुंबियांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सई ताम्हणकरच्या उत्तराने वेधलं लक्ष

दरम्यान सिद्धार्थ सध्या हा दुबईत फिरताना दिसत आहे. तो सध्या दुबईतील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. मात्र या ठिकाणी त्याला महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची प्रचंड आठवण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar missing maharashtrian food in dubai share post nrp
First published on: 02-10-2023 at 10:36 IST