Premium

“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

‘मी टू’ मोहिमेत राखीच्या आरोपांचा सामना करणाऱ्या तनुश्रीने केले गंभीर आरोप, ड्रामा क्वीनची जुनी प्रकरणं आणली समोर

tanushree dutta adil khan allegations on rakhi sawant
तनुश्री दत्ता व आदिल खानचे राखी सावंतवर आरोप (फोटो – राखी सावंत इन्स्टाग्राम आणि व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

ड्रामा क्वीन राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यात वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. राखीने या वर्षाच्या सुरुवातीला आदिलविरोधात मारहाण व फसवणुकीचे आरोप करत तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला असून राखीवर आरोप करत आहे. इतकंच नाही तर त्याने पुरावे म्हणून काही फोटो व व्हिडीओही माध्यमांना दाखवले होते. त्यानंतर राखीने त्याच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. पण दोघांचा वाद अजून शमलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

आता राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्या भांडणात आदिलला आणखी एका अभिनेत्रीकडून पाठिंबा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता आदिलची बाजू घेत पुढे आली आहे. यावेळी ‘मी टू’ चळवळीदरम्यान राखी सावंतने तिची प्रतिमा मलीन करण्याचा कसा प्रयत्न केला होता याबाबत खुलासा केला. तसेच राखी मनोरुग्ण असल्याची टीका तनुश्रीने केली आहे. यावेळी राखीच्या वारंवार धर्म बदलण्यावरूनही तनुश्रीने तिला टोला लगावला.

“ते मला रात्री घरी घ्यायला यायचे अन्…”, अमिताभ व जया बच्चन यांच्या डेटिंगच्या दिवसांबद्दल दिग्गज अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी

तनुश्रीने राखीच्या काही जुन्या प्रकरणांचा खुलासा केला. राखीने त्रास दिलेल्या काही लोकांबद्दल ती बोलली. तसेच दोन मुलांनी राखीमुळे आत्महत्या केली होती, असा दावाही तनुश्रीने केला. “त्या पीडितांना राखीशी भांडायचं नव्हतं. कारण ती त्यांच्याबद्दल खूप वाईट बोलायची. अशी दोन प्रकरणं आहेत ज्यात दोन मुलांनी आत्महत्या केली होती आणि त्या प्रकरणी राखीवर गुन्हा दाखल झाला होता, तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता,” असं तनुश्री म्हणाली. त्याबाबत आदिल पुढे म्हणाला, “हा खटला ४ वर्षे चालला पण नंतर केस संपली कारण त्या मुलांचे आई-वडील राखीबरोबर लढू शकले नाहीत.”

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

तनुश्रीने राखीच्या वागणुकीबद्दलही भाष्य केलं. ती म्हणाली, “तिच्यात जी आक्रमकता आहे, ती एखाद्या आक्रमक पुरुषासारखी भांडते. मी पाहिलं की आदिल आणि राजश्रीच्या बाबतीत खोटं बोलण्यासाठी तिच्यासोबत रोज एक नवीन माणूस येतो. ती अशी लोकं कुठून शोधते मला माहीत नाही. राखी खूप वाईट आहे. इतके धर्म बदलूनही ती स्वतःला बदलू शकली नाही. मी अनेकदा ऐकलंय की ती पकडली जाईल असं वाटलं की ती पलटते. ती अचानक बिचारी बनते आणि तिच्या त्रासाबद्दल बोलू लागते.”

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

आदिलने राखीला आपल्या पालकांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार धरले. तो म्हणाला, “माझ्या आई-वडिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास राखीमुळे सुरू झाला आहे. तिने मला कोणतेही कारण नसताना तुरुंगात टाकले, तुम्ही सर्वजण माझ्या आई-वडिलांच्या स्थितीची कल्पना करू शकता जेव्हा त्यांना कळलं की मला तुरुंगात टाकण्यात आलंय. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, ती माझ्या आई-वडिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तिने माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे माझ्या आई-वडिलांना त्रास झाला आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला,” असा आरोप आदिलने केला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tanushree dutta says two boys died because of rakhi sawant adil khan puts new allegations hrc

First published on: 21-09-2023 at 07:50 IST
Next Story
राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले आई-बाबा, घरी चिमुकल्या बाळाचं आगमन