बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे दोघेही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. गोविंदाची पत्नी ही फार मॉर्डन विचार करणारी आहे. तर दुसरीकडे गोविंदा हा देवपूजा करणारा व्यक्ती आहे. पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. पण एकदा एका मुलाखतीत गोविंदाने त्यांच्या लग्नापूर्वीचा एक किस्सा सांगितला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानतंरही मी फार साधेपणाने राहायचो. माझा आणि तिचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. सुनिता ही फार मॉर्डन विचाराची आहे. तर दुसरीकडे मी मात्र देवाची पुजा करणे, धार्मिक गोष्टीं करणे याला प्राधान्य देतो. आम्हा दोघांचीही छान मैत्री होती. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर आम्ही लग्न केले. एकदा लग्नापूर्वी आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा मी चक्क आईला फोन लावत दारु पिण्यासाठी परवानगी मागितली होती, असे गोविंदा म्हणाला.

एका मुलाखतीदरम्यान गोविंदाने या संपूर्ण गोष्टीचा खुलासा केला होता. गोविंदा म्हणाला की, बर्‍याच दिवसांनी मी आणि सुनीता ताज हॉटेलमध्ये डिनर डेटवर गेले होते. या ठिकाणी गेल्यानंतर मी फार भावूक झालो. कारण याच हॉटेलमध्ये मला नोकरीसाठी नकार मिळाला होता.

गोविंदा आणि सुनिता या दोघांनी छान जेवण केले. एकत्र डान्स केला आणि त्यानंतर शॅम्पेनचा एक घोट घेतला. पण दारु पिण्यापूर्वी मी आईला फोन केला आणि विचारले, ‘आई, मी दारु पिऊ की नको?’ यावर त्याची आई म्हणाली, ‘बरं तू पिणार आहेस…ही सवय वाईट आहे. पण जर तुला आनंद घ्यायचा असेल. तर तो आनंद घ्यावा.’

यानंतर सुनिताने माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, ‘आईला विचारले का?’ त्यावर मी होकारार्थी मान डोलवली. यानंतर मग आम्ही दोघांनी जोरदार डान्स केला. फार मजा केली. पण त्या दिवशीचा हँगओव्हर आठवडाभर तरी तसाच होता, असेही त्याने म्हटले. गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When govinda and wife went for a romantic dinner and he called his mom to ask if he could drink nrp