मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मात्र हीच मेट्रो तांत्रिक कारणांमुळे दोनच दिवसांत बंद पडली. मुंबई मेट्रोने ट्वीट करत याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


मुंबई मेट्रोच्या मागाठणे ते आरे या मार्गावरची मेट्रो तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. मुंबई मेट्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने म्हटलं आहे की, तांत्रिक कारणांमुळे मागाठणेकडून आरेकडे जाणारी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी दुसऱ्या मेट्रोची सोय करण्यात आली आहे. असुविधेबद्दल क्षमस्व!


मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला होता. सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला होता. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांची कामं टप्प्याटप्प्याने सुरू झाली होती. यापैकी ‘मेट्रो ७’ ( Metro 7 ) आणि ‘मेट्रो २ अ’च्या ( Metro 2 A ) सुमारे २० किलोमीटर मार्गावरची वाहतूक २ एप्रिलपासून सुरू झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to technical error train at magathane towards aarey has been withdrawn from service vsk