मुंबई : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसविण्यात येणार असून हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी मालाड, गोरेगाव, कांदिवली आदी परिसरातील काही भागांमध्ये ९ आणि १३ ऑक्टोबर रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 झडपा बदलीच्या कामातील पहिल्या टप्प्यात ९ ऑक्टोबर रोजी ९०० मिलिलिटर व्यासाचे ३ आणि ७५० मिलिलिटर व्यासाचा १ असे एकूण ४ व्हॉल्व बदलण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १३ सप्टेंबर रोजी ९०० मिलिलिटर व्यासाचे २ आणि ७५० मिलिलिटर व्यासाचा १ असे एकूण ३ व्हॉल्व्ह बदलण्यात येतील. सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत  पी उत्तर विभागातील मालाड पूर्व, पी दक्षिण विभागातील गोरेगाव पूर्व आणि आर दक्षिण विभागामधील कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर, लोखंडवाला, हनुमान नगर, वडार पाडा (१ आणि २) नर्सीपाडा आदी परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बॉम्ब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मालाड, गोरेगाव, कांदिवली आदी भागांतील नागरिकांनी ९ आणि १३ ऑक्टोबरच्या आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply cut in malad goregaon kandivali on 9th and 13th october amy