मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप असलेल्या सनातन संस्थेच्या कथित सदस्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीचं नाव वैभव राऊत असं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत सनातनचा सदस्य असलेल्या आरोपी वैभव राऊतच्या घरातून ८ बॉम्ब आणि गोडाऊनमधून १२ बॉम्ब जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचं हल्ल्याचं नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने आरोपी ५ वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकर पूर्ण होणार नाही या आधारावर हा जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय राऊतच्या अटकेच्या आधी त्याच्याकडून बॉम्ब जप्त करण्यात आले होते असं म्हणत भारतीय पुरावा कायदा कलम २७ चाही आधार न्यायालयाने घेतला.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
Mhada mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस

बॉम्ब सापडलेलं घर आरोपीच्या वडिलांच्या नावावर

यावेळी न्यायालयाने हेही नोंदवलं की, ज्या घरातून बॉम्ब जप्त करण्यात आले ते घर आरोपीच्या वडिलांच्या नावावर होतं आणि गोडाऊनही आरोपीच्या नावावर नव्हतं. हस्तलेखन तज्ज्ञांचे मत वगळता जप्त करण्यात आलेल्या डायरीला इतर कोणताही दुजोरा नाही.

नेमकं प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने २०१८ मध्ये आरोपी वैभव राऊत आणि इतरांवर कारवाई केली होती. तसेच त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. एटीएसच्या म्हणण्यानुसार, आरोपी वैभव राऊत आणि इतर आरोपी भारताला अस्थिर करण्याच्या मोठ्या कटाचा भाग होते. त्यांना काही दहशतवादी कृत्य करून देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व संपवायची होती.

हेही वाचा : ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ हिंदुत्त्ववाद्यांच्या घोषणा

पुण्यातील सनबर्न कार्यक्रम उथळून लावण्यासाठी बॉम्ब हल्ल्याचा कट

आरोपी राऊत आणि इतर आरोपी हे सनातन संस्थेचे सक्रीय सदस्य होते. सनातन संस्थेचा हेतू हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा आहे. यासाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमध्ये गुप्तपणे दहशतवादी कृत्य करण्यासाठी टोळ्या निर्माण करणे हाही त्यांचा उद्देश होता. त्यांनी पुण्यातील सनबर्न कार्यक्रम पाश्चिमात्य सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचा आरोप करत तो उथळून लावण्यासाठी बॉम्बचा साठा निर्माण केला होता.