नागपूर : युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजूरकर याने जामठा-खरसमारी गावाजवळील गिरनार फार्महाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘रेव्ह पार्टी ’ची समाजमाध्यमांवर जाहिरात करण्यात आली होती व त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील तरुण-तरुणी नागपुरात आल्या होत्या. पार्टीत विदेशी मद्याची सोय करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सईश वारजूरकर हा चंद्रपूरचा आहे. त्याने ही पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी १० दिवसांपासून समाजमाध्यमांवर जाहिरात केली जात होती. तसेच पार्टीसाठी ग्रामपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली. मात्र ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. आयोजकांनी कारवाई टाळण्यासाठी हिंगणा पोलिसांशी हातमिळवणी केली. त्यामुळेच तेथील सुरक्षेसाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली होती.

या पार्टीत पुणे, मुंबईसारख्या शहरातून शेकडो तर इतर भागातून अंदाजे तीन हजार तरुण-तरुणी गिरनार फार्महाऊसमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासाठी सहआयोजक छगन कुवजीभाई पटेल (६५) आणि शिव वडेट्टीवार (३२) रहाटे कॉलनी यांनी महागडी विदेशी दारू आणि अन्य अंमली पदार्थांची व्यवस्था केली होती. मध्यरात्री कर्णकर्कश संगीताच्या तालावर नशेत तरुण-तरुणी नृत्य करीत होते. कोट्यवधीचा खर्च या पार्टीवर करण्यात आला होता.

पोलिसांचा छापा आणि पार्टीत पळापळ पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना मध्यरात्री रेव्ह पार्टीची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे छापा घातला. त्यामुळे पार्टीत एकच गोंधळ उडाला. तरुण-तरुणींनी दिसेल त्या मार्गाने पळ काढला. अनेकांनी विमानतळाच्या दिशेने धाव घेत पुणे-मुंबई गाठण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youths across the state nagpur rev party advertising social media ysh