-
सैफ अली खान आणि अमृता सिंग १९९१ साली विवाहबद्ध झाले. मात्र, २००४ मध्ये तेरा वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
-
या जोडप्याला इब्राहिम अली खान आणि सारा अली खान ही दोन मुले असून ती आई अमृतासोबत राहतात.
-
सैफने २०१२ मध्ये करीना कपूर खानसोबत दुसरे लग्न केले. या जोडप्याला तैमूर आणि जेह ही दोन मुले देखील आहेत. एका मुलाखतीदरम्यान करीना कपूर खानने सैफची पहिली पत्नी अमृताबद्दल एक गोष्ट सांगितली होती.
-
सैफ अली खानशी लग्न होण्याच्या चार वर्षांपूर्वी २००८ मध्ये एका मुलाखतीदरम्यान करिनाने अमृता सिंगबद्दल तिचे मत व्यक्त केले होते.
-
दरम्यान, सैफ अली खान शेवटचा २०२३ च्या पौराणिक चित्रपट ‘आदिपुरुष’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
-
तर करीना कपूर खानचा शेवटचा चित्रपट २०२४ मधील ‘क्रू’ होता. या चित्रपटात तिने तबू आणि कृती सेनॉनसह स्क्रीन शेअर केली. हा चित्रपट एक व्यावसायिक हिट होता.
-
अमृता सिंग शेवटची २०२२ मध्ये आलेल्या ‘हिरोपंती 2’ मध्ये दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये दिसली नाही.
-
पीपल मॅगझिनशी बोलताना करीना म्हणाली होती, “मी या गोष्टीचा आदर करते की सैफ आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन सुंदर मुले आहेत. मी नेहमीच अमृता सिंगची फॅन राहिली आहे.”
-
“मी त्यांना कधीही भेटले नाही पण मी त्यांना त्यांच्या चित्रपटांमधून ओळखते. माझ्यासाठी त्या सैफच्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाच्या असतील कारण त्या सैफ अली खानची पहिली पत्नी आणि त्याच्या मुलांची आई आहे.”
-
“मी सैफला सांगितले आहे की अमृता यांना नेहमी असाच सन्मान मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या आई-वडिलांनी मला हेच शिकवले आहे.”
-
सैफ आणि अमृताच्या अयशस्वी लग्नाबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, “अखेर, हे फक्त एक लग्न होते जे यशस्वी झाले नाही, मी नेहमीच सैफला अमृताशी मैत्री करण्यासाठी प्रोत्साहित केले.”
-
“मला वाटते की त्यांना फक्त वेळ हवा आहे, पण त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. सैफच्या इतर कोणतेही नातेसंबंध खरोखर महत्त्वाचे आहेत, असे मला वाटत नाही.”
करीना कपूरने सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीबाबत केले होते ‘हे’ वक्तव्य; म्हणाली, “मी सैफला नेहमीच अमृताशी…”
एका मुलाखतीदरम्यान करीना कपूर खानने सैफची पहिली पत्नी अमृताबद्दल एक गोष्ट सांगितली होती.
Web Title: Kareena kapoor made this statement about saif ali khan first wife i always encouraged saif to be friends with amrita she said pvp